सकाळी नाश्ता करणे फारच गरजेचे आहे. कारण नाश्ता न केल्याने दिवसभर थकवा जाणवतो. परंतु नाश्त्याला काय खावं हा अनेकांना प्रश्न पडतो. परंतु जर नाश्ता केल्याने पोटही भरेल आणि वजन कमी होण्यास मदत होईल असे पदार्थ मिळाले तर भारीच ना.

चला तर मग आज आपण जाणून घेऊया नाश्त्यात काय खावं जेणेकरून वजन कमी होईल अन् शरीराला फायदेही होतील.

– ओट्स
ओट्स हा पदार्थ सध्या सर्वत्र मिळतो. त्यामुळे सकाळी नाश्ता करताना तुम्ही ओट्स खाऊ शकता. तुम्हाला माहिती आहे का ओट्स खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे वजन तर कमी होतेच परंतु हृदयविकाराचा धोकाही कमी होते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

– लापशी
लापसी हा पदार्थ गोड असतो. त्यामुळे तो अनेकांना आवडतो. तुम्ही नाश्त्यात लापशी खाऊ शकता. लापशी हेल्दी फूड आहे. यामुळे वजन कमी होते. तसेच हा पदार्थ लगेच पचन होतो. त्यामुळे वजन वाढत नाही.