गेल्या दीड-दोन वर्षापासून गायब झालेला कोरोना पुन्हा परतला आहे. चीनसह अनेक देशांत कोरोनाने पुन्हा धुमाकूळ घालायला सुरूवात केली आहे. त्यामुळे सर्वत्र जगभरात खळबळ उडाली आहे. भारत सरकारही आता सतर्क झाले आहे. परंतु घाबरण्याचे कारण नाही.
कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे. त्यासाठी काही सोपे उपाय आहेत. ती वाढवण्यासाठी काय खावे हे आपण जाणून घेऊया.
- व्हिटॅमिन C हा घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळे आवळा, संत्री, लिंबू, मोसंबी, हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे रोज खा.
- ड्रायफ्रूट्स खाण्यावर भर द्या. अक्रोड, काजू, बदाम खा.
- दही, ताक, इडली, डोसा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- हळद आणि दूध एकत्र मिसळा आणि रोज सकाळी त्याचे सेवन करा.
- चहा पित असाल तर त्याऐवजी हर्बल टी प्या.
- सर्वांनी आपल्या शरीराची काळजी घ्यावी तसेच रोज व्यायाम करावा.
लक्षात ठेवा रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर तुम्ही कोणत्याही आजाराचा सामना करू शकता.