रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठी व्यायामाबरोबरच काही फळांचे सेवन गरजेचे आहे. जाणून घेऊया कोणती फळ रक्तातील ऑक्सिजन वाढवतात.
किवी
किवीमधील साखरेचे विघटन होताना शरीरात ॲसिड तयार होत नाही. या फळामधील साखर ही शरीरात अल्केलाईनचे काम करते. ज्यामुळे शरीराला ऑक्सिजन मिळण्यास मोठ्या प्रमाणात मदत करते.
संत्री, मोसंबी, लिंबू
संत्री, मोसंबी, लिंबू या फळांमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. या फळांच्या सेवनामुळे शरीलाला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळण्यास मदत करते.
पेर
पेर या फळामुळे शरीरातील शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत मिळते.
अननस
अननसामध्ये अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे शरीरात रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळते.अननसमध्ये पीएच लेव्हल ही 8 पेक्षा अधिक असते त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते.
आंबा, पपई
आंबा, पपई या फळांची पीएच लेव्हल 8.5 असते. तसेच या फळांच्या सेवनामुळे मूत्रपिंड स्वच्छ राहते. तसेच पचनसंस्था चांगली राहते.
कलिंगड
कलिंगडामध्ये सगळ्यात जास्त अल्केलाईन असते. त्यामुळे या फळाचा पीएच लेव्हलही 9 पर्यंत असते. त्यामुळे या फळाच्या सेवनामुळे ऑक्सिजन वाढण्यास मदत मिळते. तसेच या फळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा समावेश असतो.
जर्दाळू
जर्दाळूच्या सेवनाने शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. शिवाय जर्दाळू पित्त कमी करण्यास मदत करते.
द्राक्ष, गाजर, खजूर, मनुका, जांभूळ, पिकलेली केळी
या मध्ये अँटिऑक्सिडेंट्स सुद्धा जास्त प्रमाणात असतात तसेच यांची पीएच लेव्हल पण जास्त असते.