माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : उन्हाळ्या म्हणजे द्राक्षांचा हंगाम… उन्हाळ्यात गरे असलेल्या फाळांना मोठी मागणी असते. त्यामुळे द्राक्षही भाव खाऊन जातात. त्यात काळी द्राक्ष जास्तच भाव खातात. कारण काळी द्राक्ष खाण्याचे अनेक फायदे असल्याने उन्हाळ्यात या द्राक्षांना अधिक मागणी असते. केसांपासून ते पोटापर्यंत अनेक समस्यांवर काळी द्राक्ष गुणकारी ठरतात. (boost immunity)
काळी द्राक्षे अँटिऑक्सिडेंट आणि इतर पोषकतत्वांनी समृद्ध असतात. त्यामुळे उन्हाळ्यात पसरणाऱ्या आजारात ही द्राक्ष आरोग्याला अत्यंत फायदेशीर ठरतात. काळ्या द्राक्षांमुळे डोळ्यांची निगा राखली जाऊन, दृष्टी सुधारण्यास मदत होते. यशिवाय या द्राक्षात पोटॅशियम असते, त्यामुळे ते हृदयासाठीही फायदेशीर असतात. या द्राक्षांतील जीवनसत्त्वांमुळे केस आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
हे ही वाचा ः Diabetes : बदाम खा अन् मधुमेह नियंत्रित ठेवा, संशोधनात सिद्ध
वजन नियंत्रित राहण्यास मदत
काळ्या द्राक्षांमध्ये आधिक फायबर आणि कमी कॅलरीज असतात, त्यामुळे भूक कमी होऊन खाण्यावर नियंत्रण राहते. त्यामुळे वजन कमी करण्यास ही द्राक्ष प्रभावी ठरतात. काळी द्राक्ष खाल्ल्याने आपल्याला जास्त काळ पोट भरलेले वाटते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
काळ्या द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सीही भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून उन्हाळ्यात पसरणाऱ्या संक्रमणाचा धोका घटतो.
हे ही वाचा ः शांत झोपेसाठी रोज पिस्ता खा..! ताणतणाव, चिंता राहिलं कायमची दूर
कर्करोगापासून बचाव
रेझवेराट्रोल आणि क्वेर्सेटिन सारख्या संयुगे, कर्करोग विरोधी गुणधर्म असल्याचे दर्शविले गेले आहे. काळ्या द्राक्षातील अँटिऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी होते. यामुळे कर्करोगापासून बचाव करण्यास मदत होते.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.