माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : फिटनेस फॉलो करणारे लोक रोज चहा, दुधाच्या कॉफी ऐवजी ब्लॅक कॉफी पिणे पसंत करतात. ब्लॅक कॉफी योग्य प्रमाणात पिल्यास मधुमेह, स्ट्रोक, हृदयविकार याचा धोका कमी होतो. मात्र या ब्लॅक कॉफीच्या अतिरिक्त सेवनामुळे निद्रानाश, अस्वस्थता आणि छातीत जळजळ असे प्रकार उद्बवतात. त्यामुळे ब्लॅक कॉफी योग्य प्रमाणात व योग्य वेळी  घेतलेली उत्तम. (Black Coffee drink Benefits)

हे ही वाचा ः डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

एक कप गरम पाण्यातून ब्लॅक कॉफी पिणे चांगले मानले जाते. यामुळे ऊर्जा वाढून थकवा दूर होण्यास मदत होते. आरोग्याच्या दृष्टीने ब्लॅक कॉफी जगात सर्वात लोकप्रिय आहे. कॉफीमध्ये कमी कॅलरीस असल्याने ही मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही उत्तम पेय आहे, असे स्टर्लिंग हॉस्पिटलच्या प्रमुख आहारतज्ज्ञ पूजा शेलट सांगतात.

कधी व किती वेळा प्यावी ब्लॅक कॉफी
ब्लॅक कॉफी पिण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी मध्यावर किंवा उशीरा ही आहे. या वेळी तुमच्या शरीरातील कोर्टिसोल पातळी सर्वात कमी असते. जर एखादी व्यक्ती साधारणपणे सकाळी ६.३० वाजता उठत असेल तर त्यांसाठी ब्लॅक कॉफी पिण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी ९.०० ते ११.०० असेल.

हे ही वाचा ः वजन कमी करण्यासाठी ‘हे’ ड्रिंक आहे अत्यंत गुणकारी

ब्लॅक कॉफीचे फायदे
ब्लॅक कॉफीचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने केवळ शरीरातील ऊर्जाच वाढत नाही तर तुम्ही अनेक जुनाट आजारांपासून दूर राहू शकतात. एकाग्रता वाढणे, तणाव कमी करणे यासाठी ब्लॅक कॉफीचे सेवन फायदेशीर ठरते. यातील कॅफीन हे उत्तेजक, सतर्कता वाढवण्यासाठी आणि थकवा कमी करण्याचे कार्य करते. इतकेच नाही तर रक्तदाब कमी करण्यासाठी देखील ब्लॅक कॉफी चांगली मानली जाते. याशिवाय स्मरणशक्ती सुधारण्यास आणि यकृताच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते, कारण ती विषारी पदार्थांमुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत करते.

(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)