पुणे : 12 च्या विद्यार्थ्यांनासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. उद्या गुरुवार (दि.25 मे) रोडी बारावीचा निकाल (12th result) जाहीर होणार आहे. दुपारी 2 वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा होती. त्यामुळी ही प्रतिक्षा आता संपली असून उद्या विद्यार्थ्यांच्या हातात निकाल येणार आहे. याबाबत राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी माहिती दिली आहे.

पुणे बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा पार पडली होती. यंदाच्या वर्षी साधारण 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यामुळं आता उद्या (गुरुवारी) खऱ्या अर्थानं 14 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरणार आहे.

या साईटवर बघा निकाल
दरम्यान परीक्षांचे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळाला भेट देणं अपेक्षित असेल. त्यासोबतच mahresult.nic.in, hscresult.mkcl.org आणि mahresults.org.in या लिंकवर जाऊनही निकाल पाहू शकतात.