सुकामेवा खरेदी करताना काजू, बदाम, खारीक, पिस्ता, अंजीर यांनाच प्राधान्य दिले जाते. मात्र अक्रोड च्या सेवनाने होणाऱ्या फायद्यांची माहिती नसल्याने बहुगुणी असणारे अक्रोड अनेकदा दुर्लक्षित राहते. जाणून घेऊयात अक्रोडाचे खाण्याचे फायदे
सौंदर्यवर्धक अक्रोड
i)अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई आणि भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात. यामुळे केसांचे आणि त्वचेचे सौंदर्य वाढण्यास मदत होते. ii)अक्रोडमध्ये ओमेगा-३ हा घटक त्वचेतील कोलेजन वाढवण्यास मदत करतो. त्यामुळे त्वचा निरोगी आणि तरुण राहते.
iii)स्कीन स्क्रबसाठी करण्यासाठी अक्रोडचा वापर करतात.
iv)तजेलदार आणि ग्लोइंग स्किन हवी असेल तर दुधामध्ये अक्रोड पावडर टाकून पेस्ट बनवा. हा फेसपॅक १० ते १५ मिनिटांनी धुवून टाका. यामुळे स्किन फ्रेश आणि चमकदार बनते.
v)चेहऱ्यावरील काळे वांग असणाऱ्यांनी अक्रोड बारीक उगाळून त्याचा लेप चोळून लावावा. काळे वांग कमी होण्यास सुरूवात होते.
निद्रानाशावर उपयुक्त
झोपताना अक्रोडच्या तेलाने मसाज करावी. शांत आणि उत्तम झोप लागते. नियमितपणे अक्रोड खाल्ल्यास नैराश्य ताणतणाव कमी होण्यास मदत होते.
शरीराला ऊर्जा मिळते
भाजलेले अक्रोड नियमितपणे खाल्याने शरीरातील ताकद वाढण्यास मदत होते.
बुद्धिवर्धक अक्रोड
नियमितपणे अक्रोड खाल्ल्यास मेंदूची कार्यक्षमता वाढीस लागते. तसेच स्मरणशक्ती आणि एकाग्रता देखील वाढते.
अनेक आजारांवर गुणकारी
i)अक्रोड खाल्याने कोलेस्ट्रोल कमी होते. त्यामुळे अक्रोडचे सेवन केल्याने रक्तदाब, हृदयरोग आणि इतर काही आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते.
ii)अक्रोडमधील गुणधर्म रक्तप्रवाह सुरळित ठेवतात.
iii)अक्रोडमुळे रक्तातील साखर वाढत नसल्यामुळे मधुमेहाचा धोका ३० टक्क्यांनी कमी होतो.
iv)अक्रोडमधील अँटी ऑक्सिडन्ट घटक कॅन्सरला दूर ठेवण्यास मदत करतात.
v)जेवणानंतर अक्रोड खाल्याने जेवणाचे पचन व्यवस्थित होण्यास मदत होते.
टीप – अक्रोड खाण्याचे अनेक फायदे असले तरी मात्र अक्रोड जास्त प्रमाणात खाऊ नये. यामुळे शरीराचा दाह होतो.