अनेक जणांना रात्री जेवल्यानंतर लगेचच झोपण्याची सवय असते. परंतु तुमची ही सवय तुम्हाला अत्यंत घातक ठरू शकते. त्यामुळे तुम्ही असे करत असाल तर ही सवय तुम्ही तात्काळ बदलली पाहिजे. कारण जेवून लगेचच झोपल्यास अन्न न पचणे आणि वजन वाढणे अशा समस्या उद्भवतात. यावर सर्वात सोपा आणि दुर्गामी उपाय म्हणजे रात्री जेवण झाल्यावर ‘शतपावली’ करणे.

जेवण झाल्यावर शतपावली करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे जेवण लवकर पचून, रोगप्रतिकारक शक्तीही सुधारते. तसेच रात्री ठंड हवेत फिरून आल्याने तुम्हाला झोपही लवकर लागते. आपले आई वडील, आजी आजोबा अशा ज्येष्ठ व्यक्ती आपल्याला नेहमीच जेवनानंतर चालण्याचा सल्ला देत असता. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत रात्री जेवनानंतर चालण्याचे फायदे.

रात्री जेवनानंतर चालण्याचे फायदे :
1. रात्री जेवल्यानंतर 15 ते 30 मिनिटे चालल्याने पचनशक्ती सुधारते. त्यामुळे जेवणही लवकरच पचते. जेव्हा तुम्ही जेवल्यावर झोपतात तेव्हा पचनशक्ती अजून कमी होते. तसेच पोटाच्या समस्या जाणवू लागतात. त्यामुळे जेवल्यानंतर रोज रात्री चालावे.
2. अनेक संशोधनात एक बाब समोर आली आहे की, रात्री जेवल्यानंतर शतपवली केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. तसेच गॅस होणे, झोप न लागणे या समस्याही दूर होतात. याशिवाय हृदय तंदुरुस्त राहते.
3. जेवल्यानंतर चाललण्याने मानसिक आरोग्यातही सुधारणा होते. कारण चाललण्याने तणाव वाढण्यासाठी कारणीभूत असलेले हॉर्मोन कमी होतात. कारण चाललण्यान अँडॉर्फिन रिलीज होते. हे एक शरीरात तयार होणारे नैसर्गिक पेन किलर सारखे काम करते. जेवनानंतर चाललल्याने शरीरावरचा ताणही कमी होतो.
4. रात्री जेवल्यानंतर चालून आल्याने तुम्हाला शांत झोप लागेल. जर तुम्ही जेवल्यानंतर चालत नसला तर तुम्हाला शांत झोप लागणार नाही. कारण जेवन पचण्यास काही वेळ लागत असतो. त्यामुळे जेवल्यानंतर किमान 10 ते 15 मिनिटे तरी नक्की चालावे.