त्वचेची काळजी घेण्यासाठी क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरा‍यजिंग करणे गरजेचे असते. ग्लिसरीन क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरा‍यजर म्हणून वापरता येते. यामुळे त्वचा तर चमकदार बनते शिवाय इतर अधिक ब्युटी प्रॉडक्ट वापरण्याची गरज पडत नाही. जाणून घ्या ग्लिसरीन क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरा‍यजर म्हणून कसे वापरावे –

क्लिंजर
एक चमचा ग्लिसरीन आणि अर्धा चमचा मध मिसळून क्लिंजर बनवता येते. हे क्लिंजर तुम्ही सकाळ, संध्याकाळ त्वचेला लावू शकता.

टोनर
चेहरा स्वच्छ करताना, मेकअप करताना किंवा मेकअप काढताना टोनर लागतो. ग्लिसरीनपासून टोनर बनवता येतो. ग्लिसरीनमध्ये जेवढे ग्लिसरीन आहे तेवढेच पाणी मिक्स करून ते स्पे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि टोनर म्हणून वापरा.

मॉइश्चरा‍यर
ग्लिसरीन हे एक उत्तम मॉइश्चरा‍यर आहे. कापसाच्या बोळ्यावर ग्लिसरीन घेऊन चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मॉइश्चरा‍ईज होऊन त्वचा चमकदार बनते.