सामान्य हळदीपेक्षा आंबेहळद अनेक आजारांवर प्रभावी आहे. आजारांवर उपाय म्हणून शरीरावर चोळण्यासाठी आणि लेप देण्यासाठी आंबेहळद वापरतात. जाणून घ्या आंबेहळद कोणकोणत्या आजारांवर प्रभावी आहे.
मुक्कामार, सूज आल्यावर, रक्त साकळले असल्यास आंबेहळद उगाळून कोमट करून लावावी. यामुळे सूज आणि वेदना कमी होतात.
आंबेहळद आणि दूध किंवा मलई एकत्र करून त्वचेवर लावल्यास त्वचेचा रंग उजळतो. शरीरावर काळसर डाग पडले असतील तर त्यावर आंबेहळद नियमिपणे लावल्याने डाग कमी होतात. तसेच अंगावर पुरळ आले असतील, खाज येत असेल तर त्या भागावर आंबेहळदीचा लेप लावावा.
टीप – आंबेहळदीला लवकर कीड लागू शकते. त्यामुळे तिची साठवणूक व्यवस्थित करावी. कीड लागलेली आंबेहळद कधी वापरू नये. तसेच आंबेहळदीचे सेवनही करू नये. शरीराच्या बाह्यभागावरच आंबेहळदीचा वापर करावा.