चहा हे जगात सर्वाधिक पिले जाणारे पेय आहे. चहा हा भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. असं म्हणतात चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा हवा असतो. चहा पिल्यामुळे अनेकांना स्फूर्ती उत्साह आल्यासारखं वाटत. चहाचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक चहापासून मिळणारे फायदेही वेगवेगळे आहेत. चहा जरी अनेक गोष्टींवर गुणकारी असला तरी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नुकसानकारकच असतो. त्यामुळे चहाचे अति सेवनही करू नये. जाऊन घ्या चहा पिण्याचे फायदे –

चहामध्ये कॅफेन आणि टॅनिन असते, ज्यामुळे शरीरात स्फुर्ती निर्माण होते आणि तुम्हाला तरतरीत झाल्यासारखे वाटते.

कोरा चहा हा रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित करतो.
चहा शरीरातील अँटी-ऑक्सिडेन्स इम्युन सिस्टिम व्यवस्थित राहते. त्यामुळे काही आजार दूर राहतात.

चहामध्ये असलेले अमिनो-ऍसिड डोक्याला शांत ठेवण्यास मदत करतो.

आल्याचा चहामुळे सर्दी, डोकेदुखी, खोकला कमी होतो.
गवती चहामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

अतिसार किंवा उलट्या होत असल्यास कोरा चहा प्यावा.

तुळशीचा चहा प्यायल्याने रक्ताभिसरण व्यवस्थित राहते. तसेच कोलेस्टेरॉल लेव्हल कमी होते, यामुळे हृदरोग होण्याचा धोका कमी होतो.
तुळशीच्या चहामध्ये व्हिटॅमिन ए असते, ज्यामुळे डोळयांची दृष्टी व्यवस्थित राहते.

गुळाच्या चहामुळे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढते. चयापचय संस्था व्यवस्थित काम करते तसेच गुळाचा चहा हा कफनाशक देखील आहे. गुळाचा चहा पिल्याने पाचकरस सक्रीय होऊन बद्धकोष्ठता कमी होते.

ग्रीन टी नियमित पिल्याने वजन कमी होते असे म्हणतात