सैंधव मीठातील पोषक घटकांमुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते. यामुळे शरीरातील अतिरिक्त विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातात.

सैंधव मीठ हे वेदनाशामक आहे. थकवा जाणवत असल्यास गरम पाण्यात सैंधव मीठ टाकून 10 मिनिटे पाय बुडवून ठेवा किंवा अंघोळीच्या पाण्यात सैंधव मीठ टाकून अंघोळ करा. यामुळे ताण-तणाव कमी होतो आणि ताजतवानं वाटतं. आठवड्यात 2-3 दिवस तुम्ही हा उपाय करू शकता. रोज सैंधव मिठाचा वापर करू नये.

सैंधव मिठाचे इतर फायदे

सैंधव मिठाच्या सेवनाने गोड खाण्याची इच्छा कमी होते. हे मीठ चरबी कमी करणे, रक्तदाब स्थिर ठेवणं, चयापचय क्रिया नियंत्रित करणं यासाठी सैंधव मिठ उपयुक्त आहे.

नखांवरचे पिवळसर डाग काढण्यासाठी सैंधव मिठाचा उपयोग होतो.

टॉन्सिल्स दुखत असेल तर सैंधव मिठाच्या पाण्यानं गुळण्या कराव्यात.

मुतखड्याचा त्रास असल्यास सैंधव मीठ आणि लिंबू पाण्यात मिक्स करुन प्यायल्यास काही दिवसांत फरक पडतो.

सैंधव मीठाच्या सेवनाने हाय ब्लडप्रेशर कंट्रोल कऱण्यास मदत होते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते.