तांदळाचे पाणी (rice water) म्हणजेच भाताची पेज केवळ आरोग्यासाठीच खूप गुणकारी आहे. जाणून घेऊया तांदळाचे पाणी बनवण्याची पद्धत –

कृती

अर्धा कप तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. दोन कप पाणी आणि हे धुतलेले अर्धा कप तांदूळ एका पातेल्यात शिजायला ठेवा. भात शिजत आल्यानंतर यातील पाणी गाळून घ्या. अशा रितीने तांदळाचे पाणी तयार होईल.

तांदळाच्या पाण्याचे आरोग्यवर्धक फायदे ( The health benefits of rice water)

1) थकवा येत असेल तर, तांदळाच्या पाण्यामध्ये मध मिसळून प्या.

2) भूक वाढीसाठी तांदळाच्या पाण्यामध्ये काळे मीठ टाकून प्या.

3) तांदळाची पेज आणि गूळ एकत्रित प्यायल्याने रक्ताची कमतरता दूर होते.

4) रक्ताची कमतरता असेल तर, तांदळाच्या पाण्यामध्ये गूळ मिसळून प्या.

5) चक्कर येण्याचा त्रास असेल तर तांदळाच्या पाण्यात मीठ आणि जिरे घालून प्या.

6) वजन वाढवायचे असल्यास तांदळाच्या पाण्यामध्ये तूप मिसळून प्या.