नाचणीमध्ये फायबर, प्रोटीन, पोटॅशियम, फॉस्फरस, सोडियम, झिंक, लोह आणि कॅल्शियम ही शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्वे आढळतात. जाणून घ्या नाचणीची भाकरी खाण्याचे फायदे –



हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
नाचणीमध्ये कोलेस्टेरॉल आणि सोडियम खूप कमी प्रमाणात आढळतात. हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

व्यवस्थित झोप लागते
नाचणीतील अमिनो असिड आणि अँटीऑक्सिडंट गुण हे नैसर्गिक पद्धतीने शरीराला आराम देतात. मेंदूमध्ये होणाऱ्या चिंता, डोकेदुखी, अनिद्रा यासारख्या समस्यांवर नाचणी उपयुक्त ठरते. यातील ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो असिड हे मेंदूसाठी फायदेशीर ठरून व्यवस्थित झोप लागण्यासाठी मदत होते. तसेच स्मरणशक्ती चांगली ठेवण्याचे कामही नाचणी करते.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
नाचणीमध्ये फायबर अधिक प्रमाणात असल्यामुळे एकदा खाल्ल्यानंतर त्वरीत भूक लागत नाही आणि वजन वाढण्याचा धोका कमी होतो.


मधुमेहावर नियंत्रण राहते
नाचणीच्या भाकरीमध्ये तंतुमय पदार्थाचे प्रमाण जास्त आहे. तसेच अँटीडायबिटीक गुणामुळे मधुमेहावर नियंत्रण राहते.

पोटाचे आजार होत नाही
नाचणी पचनासाठी हलकी असते. त्यामुळे नाचणीची भाकरी खाल्ल्याने अपचन, गॅस होणे यासारखे आजार होत नाहीत.

ऍनिमिया आणि हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते
नाचणी हा लोहाचा चांगला स्रोत आहे. ऍनिमिया आणि हिमोग्लोबिनची कमतरता असणाऱ्या रूग्णांनी आहारात नाचणीच्या भाकरीचा समावेश करावा.

हाडे मजबूत होतात
नाचणीमध्ये नैसर्गिकरित्या कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. रोज ठराविक प्रमाणात नाचणीचे सेवन केल्याने तुमच्या हाडांची घनता वाढते आणि हाडे मजबूत होतात.