नियमित आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने प्राणायम केल्यास शरीराला आणि मनाला अनेक फायदे होतात. जाणून घ्या प्राणायम करण्याचे फायदे –
श्वसनाची लय
नियमित प्राणायम केल्याने श्वसनाला एक प्रकारची लय येते, ज्यामुळे शरीराला फायदा होतो.
श्वसनक्रियेचे संतुलन
नियमित प्राणायम केल्याने डावी नाकपुडी (चंद्रनाडी) आणि उजवी नाकपुडी (सूर्यनाडी) यांद्वारे श्वसनक्रिया संतुलित होते, ज्यामुळे आयुर्मान वाढते.
ऑक्सिजनचा पुरवठा
नियमित प्राणायम केल्याने शरीरातील प्रत्येक मांसपेशीपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि शरीरातील कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण कमी होते.
एकाग्रतेत वाढ
नियमित प्राणायम केल्याने एकाग्रता वाढण्यास मदत होते.
पचनक्रियेत सुधारणा
नियमित प्राणायम केल्याने पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
हॉर्मोन्सचे संतुलन
प्राणायमामुळे हॉर्मोन्सच्या कार्यात संतुलन राखले जाते आणि ग्रंथी सक्रिय होतात.
फुफ्फुसांची कार्यक्षमता
नियमित प्राणायम केल्याने फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढल्याने सर्दी, खोकला आणि अस्थमा यांचे प्रमाण कमी होते.
रोगप्रतिकारक क्षमता वाढते
मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, पॅरालिसिस, वजन कमी/जास्त करणे यामध्ये प्राणायामचे महत्त्वपूर्ण फायदे आहेत.
मनःशांती
नियमित प्राणायम केल्याने मन प्रसन्न आणि उत्साही राहते. मनावर ताबा मिळवल्यामुळे कोणत्याही कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेणे शक्य होते.
( टीप : प्राणायमाचे फायदे लक्षात घेता, त्याला आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवणे आवश्यक आहे. मात्र ते शास्त्रशुद्ध पद्धतीने, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने करावे. )