निद्रानाशची समस्या असली तर रात्री झोपण्याआधी खसखशीचे गरम दूध प्या. खसखशीत मॅग्नेशिअम हे खनिज जास्त प्रमाणात आढळते. मॅग्नेशिअममध्ये शरीरातील स्ट्रेस हार्मोन कमी होतात. यामुळे मन शांत होऊन, झोप लागण्यासाठी मदत होते.
खसखशीमुळे ग्रेव्हीच्या भाज्यांना एक विशिष्ट चव आणि सुगंध येतो.
खसखस त्वचेला ओलावा प्रदान करते. तसेच चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक आणते. यामुळे चेहरा उजळ दिसतो. दुधामध्ये खसखस वाटून फेसपॅक म्हणून वापरला जातो.
जास्त तहान लागणे, ताप येणे, सूज येणे, पोटातील जळजळ पासून मुक्ती मिळविण्यासाठी खसखस वापरतात.
खसखसमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स आढळतात. यामुळे मानसिक तणाव दूर होतो. तसेच त्वचेवरील सुरकुत्या देखील कमी होतात.
खसखसमुळे शरीरात कोलॅजन या प्रथिनाची निर्मिती होते. कोलॅजनमुळे हाडे मजबूत होतात.
खसखशीत ओमेगा-3 फॅटी ऍसिड असतात. जे आपल्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात.
खसखशीत आयर्न भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे ऍनेमिया पासून बचाव होतो.
खसखशीत फायबर जास्त प्रमाणात असतात. फायबरमुळे आपली पचनशक्ती सुधारते.
खसखसीमध्ये झिंक हे खनिज जास्त प्रमाणात आढळते. रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी तसेच सर्दी, खोकला, ताप यासारखे विकार दूर ठेवण्यात झिंकचा विशेष उपयोग होतो.