अनेक शाळांमध्ये शिक्षक सकाळच्या परिपाठाचा शेवट करताना विद्यार्थ्यांकडून ओम उच्चारण करून घेतात. विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढीस लागावी हा त्यामागचा उद्देश असतो. आजकाल अनेक लोकही एकग्रता वाढावी, मनःशांती मिळावी म्हणून प्राणायम करतात. प्राणायम करताना केवळ श्वसनाचे व्यायाम करतात. या श्वसनाच्या व्यायामामध्ये ओम उच्चारण करण्याचा व्यायाम केला तर, अधिक फायदे होतात. जाणून घ्या ओम उच्चारण योग्य पद्धतीने कसे करावे आणि ओम उच्चारण करण्याचे फायदे

ओम उच्चारण योग्य पद्धतीने कसे करावे

शांत ठिकाणी बसा, आजूबाजूला गोंगाट नसेल याची काळजी घ्या. सुरुवातीला डोळे मिटून मन आणि डोळे शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. विचारांवर कंट्रोल न करता श्वासाकडे लक्ष द्या. नंतर ‘ओ’ चा उच्चार करत श्वास आत घ्या नंतर ‘म’ चा उच्चार करत श्वास सोडा. असे ३ वेळा केल्यानंतर दोन्ही हाताच्या तळव्यांचे घर्षण करून चेहऱ्यावरून फिरवा आणि नंतर चेहरा तळहातांनी झाका आणि अलगदपणे डोळे उघडा.

ओम उच्चारण केल्याने शरीराला होणारे फायदे

चांगली झोप लागते
झोपण्यापूर्वी ओम उच्चारण करा. नियमितपणे ओम उच्चारण केल्याने मन आणि शरीर तणावमुक्त होते आणि नक्कीच शांत झोप लागते.

एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते
ओम उच्चारण नियमित केल्याने एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते.

पाठीचा मणका मजबूत होतो
नियमितपणे ओम उच्चारण केल्याने संपूर्ण शरीरात कंपने तयार होतात. या कंपनांचा पाठीच्या कण्यावर सकारात्मक परिणाम होऊन त्यांची क्षमता अधिक वाढते. ओम उच्चारण करताना ताठ बसतात. त्यामुळे पाठीच्या स्नायूंना अराम मिळतो तसेच मणका मजबूत होतो.

पचनसंस्था चांगली राहते
ओमचा उच्चार केल्याने पोटाचं कंपन होते. तसेच त्यामुळे डायजेशन चांगल्या रीतीने होते.

शरीराला नवीन ऊर्जा मिळते
ओमचा उच्चार केल्याने आपल्या शरीरात एक पॉझिटिव्ह ऊर्जा संचारते. चेहरा फ्रेश होतो. शिवाय आपला मूडही चांगला बनतो. तणाव दूर होतो.

रक्ताभिसरण वाढते
शरीराला भरपूर ऑक्सिजन मिळतो. तसेच रक्ताभिसरणही चांगले होते.

थायराॅईडचा त्रास कमी होतो
ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपने निर्माण होतात. याचा थायरॉईड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो.

भीती कमी होते
मन अशांत आणि अस्वस्थ वाटत असेल किंवा ओम उच्चारण केल्याने मनातील भीती कमी होते.

थकवा, अशक्तपणा कमी होतो
सकाळी उठल्यानंतर जो थकवा वा अशक्तपणा जाणवतो तो ओमचा उच्चार केल्याने दूर होतो.