मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी आणि राग शांत करण्यासाठी मुष्टी मुद्रा प्रभावी आहे. मुष्टी मुद्रा हे आसन करताना मन शांत करावे. सर्व नकारात्मक भावना सोडून सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. जाणून घ्या मुष्टी मुद्रा हे आसन कसे करावे आणि फायदे याविषयी माहिती –


मुष्टी मुद्रा करण्याचे फायदे

तणाव आणि चिंता कमी होऊन मनाला विश्रांती मिळते.

शरीरातील ऊर्जा वाढते.

अनेक प्रकारच्या वेदनांपासून आराम मिळतो.

जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा भावनिक किंवा मानसिक त्रास किंवा स्ट्रेस येत असेल तर ही योग मुद्रा नक्की करा.

मेंदूची एकाग्रता आणि मेंटल फोकस देखील वाढण्यास मदत होते.

मुष्टी मुद्रा आसन करण्याची पद्धत

सर्वप्रथम सुखासनात बसावे.

नंतर मुठ आवळाव्यात.

अंगठा वरच्या बाजूला ठेवा.

तुमची बोटे आणि अंगठा अशा प्रकारे वाकवा की तुमचा अंगठा वरून तुमच्या अनामिकाला स्पर्श करेल.

डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या.