रेशीम उद्योगात वापरले जाणारे तुतीचे झाड मानवी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. केवळ तुतीचे फळच नाही तर, तुतीची पानेही उपयुक्त आहे. जाणून घेऊयात तुतीच्या पानांचे आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक फायदे
पानांमधील घटक
तुतीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, कॅल्शिअम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते.
घशातील जळजळ कमी होते
घशातील दाह, आग होत असेल तर तुतीची पाने उकळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. तुतीची पाने स्वेदकारी (घाम आणणारी) व वेदनाहारक असतात.
त्वचेच्या समस्यांवर गुणकारी
तुतीच्या पानांच्या रसामध्ये त्वचेच्या जखमा भरून काढण्याची, जळजळ कमी आणि जुनाट व्रण कमी करण्याची क्षमता असते. त्वचेला सतत खाज अथवा पुरळ येत असेल तर, तुतीची कोवळी पाने बारीक वाटून त्याचा लेप तयार करून लावावा.
रक्त शुद्ध होण्यास मदत करते
तुतीचे फळ आणि तुतीच्या पानांचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
पिंपल्स कमी करण्यासाठी मदत करते
चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर तुतीची कोवळी पाने बारीक वाटून त्याचा लेप तयार करा आणि तो पिंपल्सवर लावा.
शरीर डिटॉक्स होण्यास मदत करते
तसेच तुतीची पाने तुम्ही चहासोबत उकळून पिल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. त्यामुळे रक्त शुद्ध होते आणि रक्त शुद्ध असेल तर पिंपल्स येणे आपोआप कमी होते.
रक्तातील साखर कमी होते
तुतीच्या पानांमध्ये अल्फा ग्लबकोसाइडेज असतात यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. तुतीच्या पानांचा काढा अथवा चहासोबत तुतीची पाने सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.
टीप – वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणतेही घरगुती उपचार करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.