मखाना हे एक पौष्टिक आणि औषधी गुणधर्माने युक्त असे कमळासारख्या दिसणार्‍या जलपर्णीचे बीज आहे. यामध्ये भरपूर प्रोटिन, कार्बोहायड्रेट, मँग्नेशिअम, फॉस्फरस आणि पोटॅशिअम असते. मखाने हे चवीला कमी गोड असून यामध्ये शून्य कॅलरी असते. भारतात जम्मू -काश्मिर, मिझोरम, हिम‍ाचल बिहार या उत्तरेकडील राज्यांत मखानाचे उत्पन्न घेतले जाते. सध्या अनेकजण याचा फिटनेसकरता डायटमध्ये करत आहेत. अनेक रेसिपीजमध्ये मखानाचा वापर केला जातो. जाणून घेऊया मखानाच्या औषधी गुणधर्माविषयी –

१) मखानामध्ये कॅलरीज आणि फॅट्स कमी प्रमाणात असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात आणण्यासाठी मखाना अतिशय फायदेशीर आहे.

२) मखानामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशिअम, प्रोटिन्स, फॉफ्सरस, लोह, कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे हाडांची वाढ आणि विकासासाठी मखाना उपयोगी आहे.

३) मखाना ह्रदयाच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. कारण यामध्ये कोलेस्टेरॉल, सोडीयम, सॅच्युरेटेड फॅट्स अत्यल्प असतात. तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणावर मॅग्नेशियम असते. ज्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि ह्रदयाला पुरेसे ऑक्सिजन मिळते.

४) मखानामध्ये फायबर्स अधिक असतात. ज्यामुळे दिवसभर पोट भरल्यासारखे वाटतं. तळलेल्या आणि चटपटीत पदार्थांना टाळण्यासाठी मखाना हा एक उत्तम पर्याय आहे.

५) मखाना अँटिऑक्सिडेन्ट देखील आहे. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते. मखाना शरीराला डिटॉक्स करण्यासाठी फायदेशीर ठरतं. ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात.

६) मखाना ग्लुटेन फ्री आहे. तसेच त्यात भरपूर प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट्स असल्याने शरीराचे योग्य पोषणही होते.

७) यामध्ये अँटीबॅक्टरीअल गुणधर्म असतात. शरीरात दाह किंवा उष्णता जाणवत असल्यास मखानाचे सेवन अवश्य करावे.

८) मखानामध्ये अँटिएजिंग घटक असतात. मखानाच्या नियमित सेवनाने तुम्ही तरुण दिसू शकता.