माचा (Matcha Tea) ही एक विशेष प्रकारची ग्रीन टी आहे. माचा ग्रीन टी त्वचेसाठी देखील लाभदायी आहे. जाणून घ्या माचा ग्रीन टीपासून फेस पॅक कसा बनवावा तसेच माचा ग्रीन टी फेस पॅकचे फायदे –

फेस पॅक बनविण्याची पद्धत

माचा ग्रीन टी अतिशय बारीक पावडरच्या स्वरुपात उपलब्ध असते. फेस पॅक तयार करण्यासाठी यामध्ये चंदन पावडर, बेसन आणि तांदळाच्या पिठामध्ये गुलाब पाणी मिक्स करून जाडसर पेस्ट तयार करा. हे मिश्रण मान व चेहऱ्यावर लावा. आठवड्यातून तीन ते चार वेळा हा उपाय करावा.

माचा ग्रीन टीचे फेस पॅकचे फायदे

माचा ग्रीन टीचे फेस पॅक लावल्यानंतर चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते.

माचा ग्रीन टीच्या वापरामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत मिळते.

त्वचा हायड्रेटेड आणि चमकदार ठेवण्यास मदत होते.

माचा ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचे एक रासायनिक कंपाऊंड असते. जे त्वचेसाठी अँटी-ऑक्सिडंट्सच्या स्वरुपात कार्य करतात. हे घटक आपल्या त्वचेचे फ्री रॅडिकल्समुळे झालेले नुकसान लवकरात- लवकर भरून काढण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि सौंदर्य देखील खुलते. तसेच त्वचेला थंडावा मिळतो.