रोज रात्री लिपबाम लावल्यामुळे नखांचे क्युटिकल नरम होतात. तसेच नखांनाही चमक मिळते.
भुवयांना लिपबाम लावल्याने भुवया अधिक दाट आणि चमकदार दिसतात. आयशॅडो अधिक वेळ टिकवायच असेल तर आयशॅडोमध्ये लिपबाममध्ये मिक्स करून डोळ्यांचा मेकअप करा.
लिपबाम लावल्याने त्वचा मऊ आणि मुलायम बनते.
विस्कटलेले केस तसेच बेबी हेयर सेट करण्यासाठी लिपबाम उपयोगी आहे.
पायाच्या भेगा भरुन निघण्यासाठी तसेच टाचांची खडबडीत झालेली त्वचा मऊ बनवण्यासाठी लिपबामचा उपयोग होतो.
नवीन चप्पलमुळे पायांना फोड येऊ नये म्हणून लिपबाम लावावा.
आयब्रोज जाड दिसण्यासाठी ब्रशवर लिपबाम घेऊन लावा.
चेहऱ्यावर लिपबाम लावल्याने चेहऱ्याची त्वचा चमकदार दिसते. तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होतात.