शारीरिक आणि मानसिक आजारावर हास्ययोगा (Laughter Yoga) गुणकारी ठरत आहे. हास्ययोगामुळे केवळ आनंदच मिळत नाही तर, आपल्यात बरीच हार्मोन्स तयार होतात. ज्यामुळे मूडमध्ये सकारात्मक बदल दिसून येतो. यामुळे मानसिक आणि शारीरिक तणाव कमी होण्यास मदत होते. जाणून घ्या हास्ययोगा करण्याचे फायदे –

ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
नियमित हास्ययोग केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. ज्या लोकांचा रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर अनियंत्रित राहते, अशा लोकांसाठी हास्ययोगा फायदेशीर ठरतो.

शरीरातील ऑक्‍सिजनची मात्रा वाढते
हास्ययोग केल्याने शरीरात ऑक्सिजनची मात्रा वाढते. त्यामुळे शरीर अधिक क्रियाशील बनून निरोगी राहाते.

कॅलरीज बर्न होतात
हास्ययोगा नियमित केल्यानं शरीरातील कॅलरीज बर्न होतात.

ऊर्जा मिळते
हसण्यामुळे शरीराला एक प्रकारे ऊर्जा मिळते. हास्ययोगा केल्याने शरीराची रोगप्रतिकार क्षमता व संसर्गासोबत लढणारी प्रणाली सक्षम होते.

ताणतणाव कमी होतो
हसणाऱ्या व्यक्तिच्या मनात नेहमी सकारात्मक विचार येतात. हसल्यामुळे स्टड्ढेस हार्मोन्स कार्टिसोल नियंत्रणात राहतो. डोपामाइन आणि ग्रोथ हार्मोन्सची सक्रियता वाढते. त्यामुळे ताणतणाव कमी होतो.