राग, ताणतणाव मनाचा सतत कोंडमारा होऊन मानसिक स्थिती बिघडू शकते. या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी किकबॉक्सिंग हा खेळ खेळावा. किकबॉक्सिंग हा खेळ एरोबिक आणि मस्क्युलर व्यायामासारखाच असून यामुळे शारीरीक आणि मानसिक आरोग्य चांगले राहू शकते.
‘या’ पद्धतीने करा किकबॉक्सिंग
किकबॉक्सिंग करण्यापूर्वी १० ते १५ मिनिटे वॉर्म-अप करावे. त्यासाठी स्ट्रेचिंग किंवा जंपिंग जॅक्स आणि पुश-अप करावेत. किकबॉक्सिंग केल्यानंतर पाच ते दहा मिनिटे आराम करावा. त्यासाठी स्ट्रेचिंग करावे. हळू चालणे किंवा धावणे असे व्यायाम प्रकार करावेत.
किकबॉक्सिंगचे फायदे
किकबॉक्सिंग तणाव कमी होतो. या खेळाचा सराव केल्यास एंडोर्फिंस हार्मोन कार्यरत होतो.यामुळे तणाव आणि वेदनांतून सुटका होते,
किकबॉक्सिंगमुळे वजन कमी करता येऊ शकते तसेच उष्मांक जाळता येतो. शिवाय स्नायूही बळकट होतात.
किकबॉक्सिंगमुळे कंबर आणि पोटातील चरबी कमी होते.
किकबॉक्सिंगमुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते. या खेळाच्या हालचालींनी हृदय वेगाने रक्त शुद्ध करते. हृदयाला बळकटी मिळते. किकबॉक्सिंग हृदयासोबतच श्वसन क्रियेसाठीही लाभदायक आहे.
रक्तदाबही नियंत्रित राहतो.