लाल, पांढरा, गुलाबी, नारिंगी आणि पिवळा रंगात आढळणारा जास्वंद दिसायला सुंदर आहे, देवतांना आवडतो आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. जास्वंद हे फक्त एक सुंदर फूल नसून आरोग्य आणि सौंदर्य यासाठी वरदान आहे. केस गळणे, कोंडा, कोरडे केस, त्वचेवरील डाग किंवा टॅन – या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी जास्वंदीचे फूल उत्तम नैसर्गिक उपाय आहे. चला तर जाणून घेऊया याचे फायदे (Benefits of Hibiscus)
केसांसाठी जास्वंदीचे फायदे (Benefits for Hair)
केसगळती आणि खाज दूर करते (Prevents Hair Fall & Itching)
जास्वंदीच्या फुलातील antifungal गुणधर्म स्काल्प स्वच्छ करतात.
५-६ फुलं + पानं एकत्र पेस्ट करून केसांना लावा, ३ तास ठेवा आणि धुवा.
कोंड्यापासून मुक्तता (Removes Dandruff)
जास्वंदीची पावडर + मेहंदी + अर्धा चमचा लिंबू रस केसांना लावा.
एक तास ठेवून धुतल्याने कोंडा दूर होतो.
केसांची वाढ वाढवते (Promotes Hair Growth)
जास्वंदामध्ये नैसर्गिक amino acids असतात जे केसांना पोषण देतात.
५ फुलं + ५ पानं + बदाम/ऑलिव्ह ऑईल यांची पेस्ट लावा.
नैसर्गिक कंडिशनर (Natural Conditioner)
जास्वंदामुळे केस मऊ, पोषणयुक्त व चमकदार होतात.
कोरडे, निस्तेज केसांसाठी उत्तम उपाय.
चमकदार केस (Shiny & Silky Hair)
जास्वंदीची पावडर + कोरफड जेल पेस्ट आठवड्यातून २ वेळा लावा.
केस घनदाट आणि चमकदार होतील.
त्वचेसाठी जास्वंदीचे फायदे (Benefits for Skin)
टोनर म्हणून उपयोगी (Natural Skin Toner)
जास्वंद + गुलाबपाणी चेहऱ्यावर लावा.
पिंपल्सचे डाग कमी होतात, त्वचा उजळते.
टॅन दूर करते (Removes Sun Tan)
उकळत्या पाण्यात जास्वंदीचे फूल टाकून अंघोळ केल्यास टॅन कमी होतो.
नैसर्गिक एक्सफोलिएशन (Natural Exfoliator)
जास्वंदीतील natural acids त्वचेवरील काळे डाग, पिंपल्स व फोड कमी करतात.
अँटिऑक्सिडंट व व्हिटॅमिन C चा खजिना (Rich in Antioxidants & Vitamin C)
त्वचा उजळ, निरोगी आणि ग्लोइंग दिसते.