पेरू हे फळ जितके स्वादिष्ट, तितकीच त्याची पानेही औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत. पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन C, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक प्रकारची खनिजे मुबलक प्रमाणात असतात. या पानांचा वापर आरोग्यासाठी विविध प्रकारे केला जातो. जाणून घ्या पेरूची पाने खाण्याचे फायदे (benefits of guava leaves)
पचनक्रिया सुधारते (Improves Digestion)
पेरूची पाने पोटासाठी अत्यंत फायदेशीर असतात. यातील अँटीबॅक्टेरियल घटक जठरातील हानिकारक जीवाणू नष्ट करतात, त्यामुळे अॅसिडिटी, गॅस व अपचन यावर फायदा होतो. पेरूची पाने पाचन तंत्रातील हानिकारक सूक्ष्मजंतूंचा सामना करतात, बद्धकोष्ठता, अतिसार आणि अन्नजन्य आजारांचा धोका कमी करतात.
दात आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारते (Improves Dental and Gum Health)
पेरूची पाने चावणे किंवा त्याचा काढा करून तोंड धुणे हे दातदुखी, हिरड्यांची सूज आणि दुर्गंधीवर रामबाण उपाय आहे.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते (Boosts Immunity)
पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असल्याने, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीर विविध संसर्गांशी लढण्यास सक्षम होते.
अॅंटीबॅक्टेरियल व अॅंटीऑक्सिडंट गुणधर्म (Antibacterial and Antioxidant Properties)
या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अॅंटीऑक्सिडंट घटक भरपूर असतात, जे शरीरातून विषारी घटक बाहेर टाकतात आणि प्रतिकारशक्ती वाढवतात.
त्वचेसाठी फायदेशीर (Beneficial for Skin)
या पानांचा लेप त्वचेवर लावल्यास मुरूम, फोड, डाग कमी होतात. त्वचेला स्वच्छ आणि तेजस्वी बनवण्यात मदत होते.
साखरेवर नियंत्रण ठेवते (Regulates Blood Sugar)
पेरूच्या पानांमध्ये हायपोग्लायसेमिक गुणधर्म असतात, जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मधुमेहींसाठी ही पाने उपयोगी ठरतात. पेरूची पाने त्यांच्या अद्वितीय गुणधर्मांमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांनी पेरूच्या पानांचे सेवन केले पाहिजे जे इंसुलिन संवेदनशीलता सुधारून रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.
( टीप – कोणतेही घरगुती उपाय सुरु करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे, विशेषतः जर आपण औषधे घेत असाल तर.)