गीर गाय ही भारतातील सर्वात जुनी गाईची प्रजात आहे. गुजरातमधील सौराष्ट्र येथील गीर जंगलाच्या नावावरून गीर गायीचे नाव पडले आहे. गीर गाईच्या दुधामुळे अनेक आरोग्य समस्या दूर होऊ शकतात. गीर गाईच्या दुधात विविध प्रकारचे प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, एमिनो ऍसिड, उत्तम फॅट्स, खनिजे, नायट्रोजन, फॉस्फरस, कॉपर, लोह, आयोडिन, फ्लोरिन, झिंक, सिलिकॉन, सेलेनिअम, मॅग्नेशिअम हे घटक असतात. जाणून घ्या गीर गाईचे दूध नियमितपणे पिण्याचे फायदे –

पचनशक्ती सुधारते
गीर गाईचे दूध हे पचायला हलके असते. गीर गाईचे दूध पिण्यामुळे पचनशक्ती सुधारते.

रोग प्रतिकार शक्ती वाढते
गीर गाईच्या दुधामध्ये चांगले प्रोबायोटिक्स असतात. ज्यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढते.

केस मजबूत आणि चमकदार होतात
गीर गाईच्या दुधातून व्हिटॅमिन डी आणि झिंक हे केसांचे पोषण करणारे घटक आढळतात. ज्याचा परिणाम केस गळणे थांबते आणि केसांचे उत्तम पोषण झाल्यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतात.

शरीराचा विकास आणि वाढ 
हाडांचे आरोग्य आणि संपूर्ण शरीराचा विकास आणि वाढ करण्यासाठी गीर गाईचे दूध हे एक आदर्श मुख्य अन्न मानले जाते.

स्मरणशक्ती वाढते
गीर गाईचे दूध सेवन केल्याने मानसिक आरोग्य सुधारते. तसेच आपली स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते.

हाडांची मजबूती आणि विकास
गीर गाईचे दूध हे हाडांसाठी नेहमीच चांगले असते. कारण यात कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम असतात. ज्याचा हाडांची मजबूती आणि विकास होण्यासाठी फायदा होतो.

निरोगी त्वचेसाठी गुणकारी
गिर गाईच्या दुधातील समृद्ध अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेचे संपूर्ण आरोग्य सुधारू शकतात. गीर गाईचे दूध सर्वोत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे.

ह्रदयाच्या आरोग्यासाठी चांगले
गीर गाईचे दूध पिणे ह्रदयाच्या आरोग्यासाठी चांगले ठरते. कारण या दुधातून शरीराला चांगल्या फॅट्सचा पुरवठा होतो.