आलं हा मसाल्याचा पदार्थ अनेक आजारांवर गुणकारी आहे. सर्दी-खोकल्यावर गुणकारी असणारे आले इतर आजार बरे करण्यासाठीही मदत करते. जाणून घ्या आले हा पदार्थ कोणकोणत्या आजारांवर गुणकारी आहे आणि त्याचा कसा वापर करावा –
पोटाचे विकार, अपचन, भूक न लागणे
अपचन, भूक न लागणे, पोटात गॅस धरणे, उलटी, पोट साफ न होणे यांसारख्या समस्या असतील तर जेवणापूर्वी छोटा आल्याचा तुकडा मीठ लावून चावून चावून खावा.
किंवा आल्याचा रस अर्धा चमचा,सम प्रमाणात मध आणि लिंबाचा रस दिवसातून तीन वेळा घ्यावा.
सर्दी, जुनाट खोकला, श्वसन विकार, कफ
सर्दी, जुनाट खोकला, भरलेली छाती, कफ यांसारख्या समस्या असतील तर आल्याचा रस मधासोबत दिवसातून तीन वेळा घ्यावा.
आल्याचे तुकडे पाण्यात उकळून त्यात थोडी साखर टाकून ते पाणी गरम गरम प्यावे. आल्याचा चहा घ्यावा.
सुंठ आणि खडीसाखर यांचा काढा घेतल्याने कफ पातळ होण्यास मदत होते.
दाढ दुखी
आले वेदनानाशक आहे. दाढ दुखीवर आले दाढेवर धरावे.
अनियमित मासिक पाळी
अनियमित मासिक पाळी,पोट दुखी साठी आले टाकून उकळलेले पाणी दिवसातून तीन वेळा घ्यावे.