सर्दी-खोकल्यावर गुणकारी

पाण्यात लसणाच्या साली उकळवा. त्यानंतर गाळून ते पाणी प्या. त्यामुळे सर्दी-खोकल्यापासून आराम मिळेल.

पिंपल्सची समस्या कमी होते.

लसणाच्या सालीची पेस्ट पिंपल्सवर लावा. यामुळे पिंपल्सची समस्या कमी होते.

अस्थमाचा त्रास कमी होतो

लसणाची साल वाटावीत व मधात मिसळून सकाळ संध्याकाळ ते मिश्रण घेतले तर अस्थमाचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

केसांच्या समस्यांवर गुणकारी

i) लसणाच्या सालीची पेस्ट बनवून त्यात लिंबाचा रस घालून केसांच्या मुळाशी लावल्यास डोक्यातील उवा जातात.

ii) लसणाची साल पॅनमध्ये गरम करून त्याची पावडर बनवावी व ऑलिव्ह किंवा एरंडेल तेलात मिक्स करून केसांना लावल्यास केस काळे होतात.

iii) केसगळती होत असेल तर पाण्यात लसणाच्या साली उकळवून घ्या. त्यानंतर पाणी गाळून त्या पाण्याने केस धुवा.

पायावरची सूज कमी होते

लसणाची साल घातलेले पाणी उकळून त्या कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवले तर पायावरची सूज कमी होते.