महाशिवरात्रीला कवठाच्या बीमध्ये अमृत उतरते अशी यामागे श्रद्धा आहे. म्हणून महाशिवरात्रीला प्रसाद म्हणून कवठ दिले जाते. तसेच कवठ हे एक औषधी फळ देखील आहे. जाणून घ्या कवठ खाण्याचे फायदे –
पौष्टिक घटक
कवठामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, कॅल्शियम, फायबर यांसारखे पौष्टिक घटक असतात.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते
कवठामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी कवठ खाणे फायद्याचे ठरते.
पचनशक्ती सुधारते
कवठामध्ये भरपूर फायबर असते, जे अपचन, गॅस, बद्धकोष्ठता आणि पोटदुखी यासारख्या समस्या दूर करण्यास मदत करते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी, ताप यांसारख्या संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण मिळते.
हृदयासाठी फायदेशीर
कवठ हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
रक्तशुद्धीकरण
कवठ शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि रक्त शुद्ध करते, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.
त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम
कवठाचे सेवन केल्यास त्वचेला पोषण मिळते आणि पिंपल्स, डाग कमी होतात.
मधुमेह नियंत्रणात मदत
कवठाच्या सेवनामुळे शरीरातील साखर नियंत्रित राहते, त्यामुळे मधुमेहींसाठी हे फायदेशीर ठरू शकते.
हाडे आणि दात मजबूत होतात
कवठामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या असते. यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.