रोज ओले खोबर खाल्ल्याने शरीरास आरोग्यदायी असे फायदे होतात. ओल्या खोबऱ्यामध्ये प्रथिनं, जीवनसत्त्वं, लोह, कॅल्शिअम, मॅग्नीज, सेलिनियम हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. जाणून घ्या ओले खोबरे खाण्याचे फायदे –

निद्रानाशावर उपाय
झोपण्याच्या अर्धा तास आधी ओलं खोबरं खा. यामुळे तुमची निद्रानाशाची समस्या दूर होईल आणि तुम्हाला चांगली झोप येऊ लागेल.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान
ओल्या खोबऱ्याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे वरदान ठरू शकते.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
ओल्या खोबऱ्यामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट असतात जे केस आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात.व्हिटामिन ई त्वचेला सुंदर, स्वस्थ आणि चमकदार बनवतात. यासोबतच यांच्या सेवनाने केसांचा रुक्षपणा आणि तुटण्याची समस्याही कमी होते.

चयापचय क्रिया सुधारते
ओले खोबरे खाल्ल्याने आपल्या शरीरातील चयापचय क्रियाही योग्य राहते.

अशक्तपणावर मात
लोहाच्या कमतरतेमुळे हा अशक्तपणा येतो आणि यामुळे अनेक आजार होऊ शकतात. ओल्या खोबऱ्यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अशक्तपणावर मात करण्यासाठी आहारात ओल्या खोबऱ्याचा समावेश करावा.

रोगप्रतिकार शक्ती वाढवते
ओल्या खोबर्‍यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम, मॅंगनीज आणि सेलेनियम आढळतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून हे पोषक घटक विषाणूजन्य रोगांपासून शरीराचे रक्षण करतात.

स्मरणशक्ती मजबूत करते
ओले खोबरे खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते, मेंदूचं कार्य सुधारण्यात मदत होते.

सांधेदुखी कमी होते, हाडांची झीज होत नाही
ओले खोबरे नियमित खाल्ल्याने सांधेदुखी कमी होते, हाडांची झीज होत नाही. तसेच इतर गंभीर आजारांचा धोकाही कमी होतं.

रक्त प्रवाह सुरळीत राहातो
ओल्या खोबर्‍यात फिनॉलिक हा घटक असतो जो अँण्टिऑक्सिडण्टससारखा काम करतो. तसेच सुक्या खोबर्‍यामुळे पेशींचं ऑक्सिडेशन होण्याचं टळतं. रक्ताचा प्रवाह सुरळीत राहातो.

हृदय निरोगी राहते
ओले खोबरे फायबरने समृद्ध आहे आणि ते निरोगी हृदय ठेवायला मदत करतं.

वजन कमी करण्यात फायदेशीर
ओल्या खोबऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते हे खाल्ल्याने बराच काळ भूक लागत नाही. ओल्या नारळामध्ये ट्रायग्लिसराईड असते जे शरीरातील फॅट बर्न कऱण्यास मदत होते. ओल्या खोबऱ्याच्या सेवनाने शरीरात कोलेस्ट्रॉलचा स्तर योग्य प्रमाणात राहतो.

पाचनशक्ती सुधारते
ओल्या खोबऱ्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ओले खोबरे खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होत नाहीत. ओल्या खोबऱ्यामध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असते. याच्या सेवनाने बद्धकोष्ठता, ॲसिडिटी, पोटात जळजळ या समस्येपासून आराम मिळतो. यामुळे पाचनशक्ती सुधारते.

टीप – वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. उपचारापूर्वी वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.