टरबूजमध्ये अँटिऑक्सिडंट्स, क आणि ब 6 जीवनसत्व, झिंक, पोटॅशियम आणि खनिजांसह अनेक पोषक घटक आढळतात. टरबूजप्रमाणेच त्याची साल देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जाणून घ्या टरबुजची साल खाण्याचे फायदे –
पोटाच्या समस्या कमी होतात, वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
टरबूजच्या सालीमध्ये कॅलरी खूप कमी प्रमाणात असतात तसेच फायबरचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे पचनतंत्र व्यवस्थित राहून पोटाचे आरोग्य सुधारते. तसेच वजनही कमी होण्यास मदत मिळते.
एनर्जी वाढते
टरबुजची सालं खाल्ल्यानं एनर्जी वाढते. या सालींमध्ये सिटूललाईन अमिनो ऍसिड असते. ते मांसपेशींना ऑक्सिजन पुरवते.
इम्युनिटी पावर वाढते
टरबूजच्या सालीच्या सेवनाने पांढर्या रक्त पेशींच्या निर्मितीस चालना मिळते. परिणामी इम्युनिटी पावर वाढते.
रक्तदाब नियंत्रित राहतो
टरबूजच्या सालीतील घटक रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.
रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते
टरबूजच्या साली खाल्ल्याने रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते.
टीप : ताज्या आणि उत्तम प्रतीच्याच टरबुजाच्या सालीचे सेवन करावे.