मकरसंक्रांतीला तीळ आणि गुळाचे लाडू बनवून वाटण्याची प्रथा आहे. हिवाळ्यात थंड वातावरण असल्यामुळे शरीराला उष्णता आणि ऊर्जेची आवश्यकता असते. शरीराची ही गरज पूर्ण व्हावी म्हणून तिळगुळाचे लाडू खाल्ले जातात. तिळगुळाच्या लाडूंमुळे शरीराला ऊब मिळते आणि आपली प्रतिकारशक्ती मजबूत होते. एकमेकांना लाडू वाटून परस्पर संबंध वृद्धिगत केले जातात. एकमेकातील राग, लोभ आणि कटुता विसरून एकमेकांशी संबंध मधुर राहावेत म्हणून तिळगुळ दिला जातो.
हिवाळ्यात तीळ खाणे फायदेशीर मानले जाते. तिळामध्ये पॉलिसॅच्युरेटेड ओमेगा-6, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे शरीरासाठी पोषक असणारे घटक असतात.
थंडीच्या दिवसात शरीराला अधिक ऊर्जा आशी स्निग्धांशाची गरज असते. तीळ हा स्निग्ध पदार्थ असून तिळामुळे शरीरात उष्णता कायम ठेवण्यास मदत होते.
तिळ आणि गुळात फायबर, पोटॅशिअम, अँटीऑक्सिडंट्स उच्च प्रमाणात असल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.
हाडांच्या पोषणासाठी व बळकटीसाठी तीळ आणि गुळ खाणे अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये हाडांचा ठिसूळपणा कमी करणारा झिंक घटक असतो.
बदाम तेलाचे आरोग्यवर्धक व सौंदर्यवर्धक फायदे
जाणून घ्या भोगीची भाजी खाण्यामागील कारणे आणि फायदे