सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, बी जीवनसत्त्वे, प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, जस्त, पोटॅशियम इत्यादी पोषक तत्वे असतात. जाणून घ्या सूर्यफुलाच्या बिया खाण्याचे फायदे –

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
सूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि लिनोलिक फॅटी ॲसिड रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.
सूर्यफुलाच्या बियांमध्ये ओमेगा-6 फॅटी ॲसिड्स आणि मॅग्नेशियम असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यातील फायटोस्टेरॉल्स कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

हाडे निरोगी आणि बळकट बनण्यास मदत
सूर्यफुलाच्या बियांमध्ये पुरेशा प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते, ज्यामुळे हाडे निरोगी आणि बळकट बनण्यास मदत होते.

मधुमेहासाठी फायदेशीर
सूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेले क्लोरोजेनिक ॲसिड रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

त्वचेसाठी गुणकारी
सूर्यफुलाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढते
सूर्यफुलाच्या बियांमध्ये झिंक आणि सेलेनियम असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

मूड सुधारतो
सूर्यफुलाच्या बियांमधील ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो ॲसिड मेंदूतील सेरोटोनिन पातळी वाढवते, ज्यामुळे मूड सुधारतो आणि नैराश्य कमी होते.

टीप – वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे.

Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply