पूर्वी लोकांच्या खाण्यामध्ये कडधान्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असायचा. न्याहारीमध्ये उकडलेली कडधान्ये, जेवणात कडधान्यांपासून बनवलेल्या विविध भाज्या, थालीपिठामध्ये कडधान्यांचा वापर एवढेच काय तर, कडधान्यांपासून बनवलेल्या भाकरीही असायच्या. म्हणून तर त्यांचे आरोग्यही निरोगी आणि शरीर काटक होते. चांगल्या आरोग्यासाठी मोड आलेले कडधान्यं खावीत. कारण याचे शरीराला खूप फायदे आहेत. त्यामुळे आपल्या आहारात आजपासूनच मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा.

कोणती कडधान्यं खायला पाहिजे?

कडधान्यं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मटकी, हरभरा, मूग, चवळी यांसारखे पदार्थ येतात. परंतु सगळेच कडधान्य पचायला सारखी नसतात. मटकी हे कडधान्य सर्वात लवकर पचते. हरभरा, पावटा आणि उडीद हे पचायला कठीण जातात. मोड आणण्यासाठी कडधान्य रात्री भिजत ठेवा. एखाद्या कापडात ही कडधान्यं रात्रभर भिजत ठेवली तर त्यांना लवकर आणि जास्त मोड येतात.

मोड आलेली कडधान्य खाण्याचे फायदे

वजन कमी होण्यास मदत
ज्यांना वजन कमी करायचं आहे अशा लोकांनी रोज सकाळी नाश्ता करताना मोड आलेली कडधान्य खावीत. यामुळे वजन कमी होते. तसेच सारखी भूक लागत नाही.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते
मोड आलेली कडधान्य खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे आपल्या शरीराचे अनेक आजारांपासून संरक्षण होते. मोड आलेल्या कडधान्यात व्हिटॅमिन ए आणि सी असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.

केस वाढतात
ज्यांना केस गळतीची समस्या आहे, ज्यांचे केस विरळ आहेत अशा लोकांनी मोड आलेली कडधान्ये खावीत. त्यामुळे केस वाढतात. तसेच केसांच्या अनेक समस्या दूर होतात.

त्वचा सुंदर होते
मोड आलेली कडधान्य खाल्ल्याने त्वचा सुंदर बनते. त्वचेला चमक येते. तसेच त्वचा तरूण दिसते.

गरोदर महिलांसाठी फायदेशीर
गरोदर महिलांनी मोड आलेली कडधान्य खावीत. याचा फायदा नवजात बाळासाठी होतो. गर्भवती महिलांनी मोड आलेले कडधान्य खाल्ले तर नवजात बालकांमध्ये मानसिक आणि शारीरिक समस्या दूर होते.

हृदयासाठी उपयुक्त
हृदयाचं आरोग्य चांगलं आणि निरोगी ठेवण्यास मोड आलेली कडधान्यं मदत करतात. त्यामुळे आपल्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा वापर करा.

आहारातील ‘या’ चुका ठरतात पुरुषांच्या केसगळतीचे कारण, ‘हे’ पदार्थ सेवन करताना काळजी घ्या!

जाणून घ्या – धुळीची अ‍ॅलर्जी का होते आणि अ‍ॅलर्जीवर कोणते घरगुती उपाय करावेत