मोड आलेल्या चण्यामध्ये कार्बोहाइड्रेट, आयर्न, कॅल्शिअम, प्रोटिन, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि हेल्दी फॅट्स आढळून येतात. जाणून घ्या नियमित मोड आलेले चणे खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे-
हिमोग्लोबीनची पातळी वाढते
रोज सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी मोड आलेले चणे खाल्ल्यास, शरीरामधील रक्तपातळी वाढते. तसेच चण्यामध्ये आयर्न आणि फॉस्फरस जास्त प्रमाणात असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी वाढते.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
चण्यामध्ये प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, आयर्न, मिनरल आणि व्हिटामिन्स असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
रक्तातील साखर नियंत्रणात राहते
मोड आलेले चण्यामधील कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स हळूहळू पचतात. याशिवाय त्यात विरघळणारे तंतू असतात, जे रक्तातील साखरेचे शोषण कमी करतात. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले हे अन्न रक्तातील साखर वाढण्यास प्रतिबंध करते आणि जास्त वेळ पोट भरलेले असल्यासारखे वाटते. यामुळे भूक लागत नाही आणि खाण्यावर नियंत्रण सुद्धा राहते.
हृदय निरोगी राहते
मोड आलेले चणे अँटिऑक्सिडंट्स आणि अँथोसायनिन्स तसेच फायटोन्यूट्रिएंट्सचे उत्तम स्रोत आहेत. त्यांचे नियमित सेवन रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करते आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
पचनक्रिया सुरळीत राहते
मोड आलेल्या चण्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि फायबर असतात. कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत राहते. यामुळेच मोड आलेल्या चण्याचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यासारखे आजार होण्याची शक्यता कमी असते.
ऊर्जा मिळते
मोड आलेले चणे खाल्याने ऊर्जा मिळते. यामुळे अशक्तपणा, थकवा दूर होऊन ताजेतवाने वाटते. त्याचबरोबर युरीनसंबंधित समस्याही दूर होतात.
स्मरणशक्ती वाढते
मोड आलेल्या चण्यामध्ये व्हिटॅमिन बी ६ म्हणजेच पायरीडॉक्सिन तसेच कोलीन भरपूर प्रमाणात असते. हे घटक मेंदूच्या कार्याला चालना देतात, स्मरणशक्ती मजबूत करतात आणि एकाग्रता सुधारतात.
केसांची वाढ होते
मोड आलेल्या चण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी असतं. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते. तसंच रक्त शुद्ध व्हायला मदत होते.
त्वचेच्या समस्या दूर होतात
मोड आलेल्या चण्यामध्ये मीठ न घालता खाल्यास त्वचेच्या समस्या दूर होतात. तसेच त्वचा चमकदार होते.
डोळ्यांचे आरोग्य सुधारते
मोड आलेल्या चण्यामध्ये असणारे व्हिटॅमिन ‘ए’ डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत.