सध्या थंडीचा मौसम सुरू आहे. त्यामुळे लोक बाहेर पडायलाही टाळाटाळ करत आहेत. तर नवीन वर्षातला पहिला सण मकर संक्रांती लवकरच येत आहे. त्यासाठी तीळाचे लाडू बनवले जातात. तसेच अनेक पदार्थांत तीळाचा वापर केला जातो. परंतु अनेकांना प्रश्न पडतो की तीळाचा वापर का करतात.
तीळ हा पदार्थ आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. तीळ खाल्ल्याने शरीराला तसे फायदे खूप मिळतात. थंडीच्या दिवसांत तीळाचे पदार्थ जास्त खाल्ले जातात. तीळ खाण्याचे फायदे वाचाल तर तुम्हीही आजपासूनच तीळ खायला सुरूवात कराल.
चला तर मग जाणून घेऊ तीळ खाण्याचे फायदे — तीळ खाल्ल्याने हाडे मजबूत राहतात. कारण यात कॅल्शियम, मॅग्नेशियम भरपूर असते.
– तीळ खाल्ल्याने आपले दात मजबूत बनतात. त्यासाठी रोज एक चमचाभर तीळ खाल्ले पाहिजे.
– तीळ खाल्ल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार बनते. तीळ थंडीच्या दिवसात तर नक्की खावेत. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही.
– आपल्याकडे भाकरीला तीळ लावून खाल्ली जाते. कारण त्यामुळे थंडीमध्ये भूक शमते म्हणजेच पोट भरते.
– केसांची समस्या असेल तर केसांना तीळाचे तेल लावावे. त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.
– तीळ खाल्ल्याने हाडे मजबूत राहतात. कारण यात कॅल्शियम, मॅग्नेशियम भरपूर असते.