खडीसाखरेमध्ये औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे अनेक औषधांमध्ये खडीसाखरेचा वापर केला जातो. खडीसाखर ही थंड गुणधर्म असलेली आहे. खडीसाखरेमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अमिनो ॲसिड असतात. रिफाईंड साखरेपेक्षा कमी गोड असलेली खडीसाखर तुमच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. कारण खडीसाखरेत रिफांईड साखरेपेक्षा कमी प्रमाणात कॅलरिज असतात. जाणून घ्या खडीसाखर खाण्याचे फायदे –
थकवा नाहीसा होतो
सतत अशक्तपणा किंवा थकवा जाणवत असेल तर रोजच्या आहारात खडीसाखरेचा समावेश करावा. यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते.
जर अशक्तपणा आला असेल तर दूधामधून खडीसाखर घेतल्याचा नक्कीच चांगला फायदा होईल.
तणाव कमी करण्यासाठी
खडीसाखर मेंदूला आराम देण्यासाठी आणि मानसिक थकवा घालवण्यासाठी फायदेशीर आहे.
पोटाचे विकार
पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित खडीसाखरेचा सेवन करावे. पोटातील गॅस, ॲसिडिटी, अपचन, पोटासंबंधित इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खडीसाखर उपयुक्त आहे. जेवणानंतर खडीसाखर आणि बडीशेप खाण्यामुळे अन्न लवकर पचते आणि अपचनाच्या समस्या कमी होतात.
हिमोग्लोबिन वाढते
नियमित खडीसाखर खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
लोहाची कमतरता
शरीरामध्ये लोहाची कमतरता जाणवू लागल्यानंतर नियमित खडीसाखरेचे सेवन करावे.
सतत तोंड येत असेल तर
खडीसाखरेमुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते. म्हणूनच जर तुम्हाला सतत तोंड येत असेल तर खडीसाखरेचा खडा तोंडात ठेवा.