पिकलेली केळी खाण्याचे फायदे सर्वांनाच माहित आहेत, मात्र कच्ची केळी सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. मात्र अनेकजण या माहितीपासून अनभिज्ञ आहेत. जाणून घ्या कच्ची केळी खाण्याचे फायदे

एनर्जी आणि इम्युनिटी वाढते
कच्च्या केळांमध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे एनर्जी टिकून राहते तसेच इम्युनिटी पावर देखील वाढते.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
कच्च्या केळीमध्ये तंतुमय पदार्थ असतात. यामुळे शरीरातील चरबी कमी होते. कच्ची केळी खाल्ल्याने पोट भरलेले राहते. तसेच हिरव्या केळीत कमी कॅलरी असतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

शरीराचं तापमान नियंत्रित राहते
केळी खाल्याने शरीराचं तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.

हृदयरोग, रक्तदाब यांसारखे आजार दूर ठेवण्यास उपयुक्त
कच्ची केळी हृदय आणि रक्तदाबाच्या समस्यांवर गुणकारी आहे. कच्च्या केळांमध्ये फायबर अधिक असल्याने कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राहते.

डायबेटिज रुग्णांसाठी गुणकारी
डायबेटिज असणाऱ्या रुग्णांसाठी कच्ची केळी लाभदायक आहेत. कच्च्या केळीमध्ये स्टार्च विरोधी घटक आणि फायबरचं अधिक प्रमाण असल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी, नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात.

हाडे मजबूत बनतात
कच्च्या केळांमध्ये कॅल्शिअम असते. त्यामुळे हाडे मजबूत बनण्यास मदत होते.

पोटाच्या आजारांवर गुणकारी
पोटाच्या अनेक समस्या दूर करण्याचे काम कच्ची केळी करते. कच्च्या केळांच्या नियमित सेवनाने पचनक्रिया सुधारते. कच्ची केळी सहजपणे पचतात आणि आतडेही स्वच्छ राहते.