नाचणीचे लाडू (Ragi Ladoo) अतिशय आरोग्यदायी आणि चवदार असतात. त्यांना बनवायलाही जास्त वेळ लागत नाही. जाणून घ्या नाचणीचे लाडू बनविण्याची पाककृती आणि नाचणीचे लाडू खाण्याचे फायदे –
नाचणीचे लाडू कसे बनवावेत
साहित्य
नाचणी पीठ २ वाटी,
पाऊणवाटी तूप,
पाऊणवाटी गूळ
कृती
कढईमध्ये तूप टाकून मंद आचेवर नाचणीचे पीठ भाजून घ्या आणि थंड होऊ दया.
नंतर गुळाचा पाक करून घ्या व त्यात भाजलेले नाचणीचे पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करावे आणि लाडू वळून घ्यावेत.
टीप : तुम्ही तुमच्या आवडीनुसार मनुका आणि काजू यांसारखे ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता. जर मिश्रण खूप कोरडे असेल तर आपण आवश्यकतेनुसार अधिक तूप घालू शकता.
नाचणीचे लाडू खाण्याचे फायदे
हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले
नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते जे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते.
रक्तवाढीसाठी उपयुक्त
नाचणीमध्ये फायबर, कॅल्शियम, प्रोटीन आणि अनेक अँटीऑक्सिडंट असतात. त्यात लोह असते. नाचणीच्या लाडूचे सेवन केल्याने शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही.
हाडे आणि दात मजबूत बनतात
नाचणीमध्ये कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे नाचणीच्या पिठाचे लाडू खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत राहण्यास मदत होते.
वजन कमी करण्यास मदत करते
नाचणीमध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी नाचणीचे लाडू हा खाणे एक उत्तम उपाय आहे.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते
नाचणीमध्ये पॉलिफेनॉल आणि फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
जाणून घ्या नाचणीचा फेसपॅक कसा बनवायचा आणि नाचणी फेसपॅकचे फायदे