भोपळ्याच्या बियांमध्ये (pumpkin seeds) भरपूर प्रमाणात खनिजे, व्हिटॅमिन के, व्हीटॅमिन ए आणि फायबर असतात. आहारात भोपळ्याच्या बियांचा समावेश केला तर शरीराला अनेक फायदे होतात. जाणून घ्या भोपळ्याच्या बिया खाण्याचे फायदे –

रक्तदाब नियंत्रणात राहतो
भोपळ्याच्या बियांमध्ये मँगनीज, तांबे, जस्त आणि फॉस्फरस यांसारखी अनेक खनिजे आढळतात. या खनिजांच्या सेवनाने रक्तदाब सामान्य राहतो.

त्वचेसाठी गुणकारी
भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन एक आणि बी जीवनसत्त्वे असतात, जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. भोपळ्याच्या बिया आणि त्यांचे तेल त्वचेसाठी फायदेशीर आहे. भोपळ्याच्या बियांमध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि सी कोलेजनचे उत्पादन वाढवतात. कोलेजन जखम भरण्यास मदत करते. हे तुमची त्वचा तरुण आणि सुरकुत्यापासून मुक्त ठेवते.

केसांसाठी गुणकारी
भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा -3 फॅटी ॲसिड, जस्त भरपूर असते. हे केस गळण्याच्या समस्येवर गुणकारी आहे. भोपळ्याच्या बियांचे सेवन केस वाढीसाठी उपयुक्त आहे.

कोलेस्टेरॉल, रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी फायदेशीर
भोपळ्याच्या बिया हे उच्च कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास देखील मदत करू शकते. या बिया हायपोग्लाइसेमिक गुणधर्मांनी समृद्ध आहेत, जे रक्तातील साखरेची पातळी संतुलित करू शकतात.