शेंगदाण्यात (peanut) व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, नियासिन, रिबोफ्लेविन, थायमिन, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी 9 आणि पॅन्टोथेनिक ॲसिड जीवनसत्व, खनिजं, शरीरासाठी पौष्टीक घटक आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. मुठभर शेंगदाण्यामध्ये 426 कॅलरीज, 5 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 17 ग्रॅम प्रोटीन असतात. जाणून घ्या शेंगदाणे खाण्याचे फायदे (Benefits of eating peanuts) –
ऊर्जा मिळते
शेंगदाण्याच्या सुमारे 50 टक्के पौष्टीक चरबी असते, जी कोणत्याही इतर पदार्थांपेक्षा अधिक कॅलरी देते. त्यामुळे शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला लगेच ऊर्जा मिळते.
हृदयाचे आरोग्य चांगले राहते
शेंगदाण्यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, वनस्पती प्रोटीन्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर आर्जिनिन आणि अनेक बायोएक्टिव्ह पदार्थ असतात, जे ब्लड प्रेशर कमी करू शकतात आणि हृदय निरोगी ठेवू शकतात. शेंगदाण्यात रेस्वेराट्रोल नावाचं अँटी-ऑक्सिडंट असतं ज्याने हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी होतो.शेंगदाण्यात असलेली पौष्टीक चरबी हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. त्याने फायटोस्टेरॉलचा चांगला पुरवठा होऊ शकतो, ज्यामुळे हार्ट प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता कमी होते.
कोलेस्टेरॉल कमी होते
शेंगदाण्यामध्ये हाय मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे शरीराचं एकूण कोलेस्टेरॉल आणि खराब कोलेस्टेरॉल कमी करू शकतात.
स्मरणशक्ती वाढते, अल्झायमर होत नाही
शेंगदाणे नियासिन, व्हिटॅमिन ई चा चांगला स्रोत आहे. व्हिटॅमिन ई आणि नियासिन कमी झालं की अल्झायमर रोग आणि वयानुसार मेंदूची शक्ती कमी होते. शेंगदाणे खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. शेंगदाण्यामध्येही ओमेगा थ्री फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत होते आणि स्मरणशक्ती वाढते.
केसांच्या समस्यांवर गुणकारी
केसांच्या समस्यांवर शेंगदाणे गुणकारी आहेत. लाइसिन केसांच्या मुळाच्या आतील भागात असतं जे केसांना आकार आणि जाडी देण्यासाठी उपयोगी असतं. लाइसिन कमी झालं की केस कमकुवत आणि पातळ होतात. केस गळतात. शेंगदाण्यात अमीनो ॲसिड असतं जे एक लाइसिन आहे.
हाडे मजबूत होतात
शेंगदाण्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात असते. यामुळे हाडे मजबूत होतात.
त्वचा तरुण दिसते
शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिज, व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळून येते. यामुळे याच्या सेवनाने त्वचा नेहमी तरुण दिसते. भिजवलेले शेंगदाणे खाण्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.
पचनशक्ती वाढते आणि भूक न लागण्याची समस्या दूर होते
शेंगदाण्याच्या नियमित सेवनाने पचनशक्ती वाढते आणि भूक न लागण्याची समस्या दूर होते. शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. ज्यामुळे तुमची पचनशक्ती मजबूत होते. पोट स्वच्छ होते आणि पोटात गॅसेस होणे, बद्धकोष्ठता, मुळव्याध, पोटाचे विकार होण्याचा त्रास कमी होतो.
शरीरसौष्ठव
शरीराच्या सुडौल आकारासाठी आणि शरीर मजबूत होण्यासाठी लागणारे पोषक घटक शेंगदाण्यामध्ये असतात. शरीराला पुरेसे पोषण मिळाल्यामुळे तुमच्या शरीराला सुरेख आकार आणि मजबूती मिळते.
टीप : उन्हाळ्यात शेंगदाणे जास्त खाऊ नयेत. उन्हाळा आला की शरीरात पित्त वाढतं. शेंगदाणे खाण्यासाठी हिवाळा हा सर्वोत्तम काळ आहे. यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते आणि शेंगदाण्याचे सहज पचनही होते.
चारकोल फेस मास्क वापरण्याचे फायदे आणि तोटे
मुलांना दुधासोबत ‘हे’ पदार्थ खायला दिल्यास होऊ शकतात साइड इफेक्ट्स