शेंगदाण्यामध्ये (Peanut) कॅलरीज, कार्बोहायड्रेट, प्रोटीन असतात. शेंगदाण्यापासून व्हिटॅमिन इ, के, आणि बी-६ भरपूर प्रमाणात मिळतात. शेंगदाण्याप्रमाणेच शेंगदाण्याचे लाडूही आरोग्यदायी आहेत. शरीराला तात्काळ ऊर्जा मिळावी म्हणून तसेच उपवासाला देखील हे शेंगदाण्याचे लाडू (Peanut laddu) खाल्ले जातात. पौष्टिक आणि चवीला उत्तम असणारे शेंगदाण्याचे लाडू बनविण्यासाठी फार मेहनतही घ्यावी लागत नाही. शेंगदाणा लाडू खाण्याचे शरीराला भरपूर फायदे मिळतात. जाणून घ्या शेंगदाणा लाडू खाण्याचे फायदे याविषयी माहिती –
थकवा दूर होतो
शरीराला जर एनर्जी मिळवायची असेल तर शेंगदाण्याचे लाडू नक्की खा. ज्यामुळे तुमच्या शरीराला लगेच एनर्जी मिळते. शिवाय थकवा दूर होतो.
रक्तप्रवाह सुरळीत होतो
शेंगदाण्याचे लाडू खाल्ल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो.
त्वचा तरुण दिसते
शेंगदाण्यात प्रोटीन,फायबर,खनिज,व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळून येतात. यामुळे शेंगदाण्याच्या लाडूच्या सेवनाने त्वचा नेहमी तरुण दिसते,चेहऱ्यावर तेज येते आणि चेहरा टवटवीत दिसतो.
सांधेदुखी आणि कंबरदुखी
शेंगदाण्याचे लाडूचे सेवन केले तर सांधेदुखी आणि कंबरदुखी या समस्यांपासून आराम मिळतो.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर
शेंगदाण्याचे लाडू खाल्ल्याने बुद्धी तेज होते. शेंगदाण्याचे लाडू स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे.
हिमोग्लोबिन वाढते
शेंगदाण्याचे लाडू नियमित खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिन तर वाढते, त्याचबरोबर शरीरात रक्ताचं प्रमाण वाढते.
हाडे मजबूत बनतात
गूळ आणि शेंगदाणे वापरून तयार केलेला हा लाडू कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत आहेत. शेंगदाण्याचे लाडू नियमित खाल्ल्याने त्यामुळे हाडे मजबूत बनतात.