पपई हे फळ अनेक घटकांनी परिपूर्ण असल्याने शरीरासाठी अत्यंत पोषक आहे. पपईमध्ये कॅलरिज, कार्बोहायड्रेट, फायबर, प्रोटिन्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फॉलेट, पोटॅशिअम, अँटि ऑक्सिडंट, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन बी1, बी3, बी5 यांसारखे पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. मात्र पपई हे फळ उष्ण असल्याने त्याचे सेवन थंड वातावरणात करावे. जाणून घ्या पपई खाण्याचे आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक फायदे –
रोगप्रतिकार शक्ती वाढते
पपईमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी मुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते.
कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते
पपई मध्ये व्हिटॅमिन सी तसेच फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पपई खाण्यामुळे रक्तामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी झाल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते.
डोळ्यांचे आरोग्य सुधारते
पपईमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या कॉर्नियाचे संरक्षण करते तर, अँटी ऑक्सिडंटमुळे रेटिना सुरक्षित राहतो.
रक्तप्रवाह सुधारतो
पपईमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि पोटॅशिअमुळे तुमचा रक्तप्रवाह सुधारतो.
पचनशक्ती सुधारते
पचनसंस्था मजबूत करण्यासाठी नियमित पपई खावी. पपईमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आणि फायबर असते. यामुळे पचनशक्ती सुधारते
डायबेटीजच्या रुग्णांसाठी लाभदायक
डायबेटीजच्या रुग्ण देखील पपई खाऊ शकतात. पपईमध्ये व्हिटॅमिन सी प्रमाणात असल्यामुळे रक्तातील साखर अधिक प्रमाणात वाढत नाही.
वजन कमी होण्यास मदत करते
नियमित पपई खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. पपईमुळे लवकर भूक लागत नाही आणि शरीराचे पोषण उत्तम होते. पपई खाण्यामुळे पचनशक्ती सुधारतेच शिवाय प्रतिकारशक्ती देखील वाढते. पपईमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक आणि फायबर असतात शिवाय त्यामध्ये कॅलरिज खूप कमी असतात. पपई खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते.
मासिक पाळीच्या समस्येवर गुणकारी
नियमित पपई खाल्ल्याने मासिक पाळीच्या वेदना कमी होतात. तसेच मासिक पाळी येण्यास उशीर झाला असेल तर पपईचे सेवन करावे. यामुळे शरीरातील उष्णता वाढून मासिक पाळी लवकर येते.
थकवा, ताणतणाव कमी होतो
पपईमध्ये भरपूर अँटि ऑक्सिडंट असतात. नियमित पपई खाल्ल्याने थकवा आणि ताणतणाव कमी होण्यास मदत होते.
त्वचा अधिक निरोगी आणि तरुण बनते
पपईमुळे शरीरातील रक्त शुद्ध होते तसेच पपईमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई असते. यामुळे त्वचा अधिक निरोगी आणि तरुण बनते.