रेशीम उद्योगासाठी लागणारे तुतीचे झाड सर्वांना परिचयाचे झाले आहे. मात्र तुती या झाडाचे आणि त्याच्या फळाचे मानवी आरोग्यासाठी असणारे विविध फायदे विषयी खूप कमी लोकांना माहिती आहे. तुती फळाला इंग्रजीमध्ये मलबेरी (Mulberry fruit) म्हणतात. जाणून घ्या तुतीचे फळ खाण्याचे फायदे
शरीरातील उष्णता कमी होते
तुतीचे फळ खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन थंडावा निर्माण होतो.
भूक वाढीसाठी उपयुक्त
तुतीची फळे भूक वाढीसाठी उपयोगी आहेत. भूक मंद झाल्यास झाल्यास तुतीचे फळ खावे.
घशाची कोरड कमी करते
ताप आल्यावर घसा कोरडा पडतो. तापात तहान भागविण्यासाठी तुतीची फळे खावे.
रक्त शुद्ध होण्यास मदत करते
तुतीची फळे खाल्ल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते. तुतीची फळे विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक
तुतीची फळ खाल्ल्याने दृष्टी सुधारते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
तुतीच्या फळामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त
तुतीच्या फळामध्ये बीटा कॅरोटीन असते. त्यामुळे तुमची त्वचा तरुण राहते.
हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त
तुतीच्या फळामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे हाडे मजबूत आणि बळकट बनतात. शिवाय हाडांच्या ऊतींचे मजबुतीकरण आणि संवर्धन होते.
टीप – तुतीचे फळ दररोज आणि जास्त प्रमाणात खाऊ नये. याचा मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. तुतीची फळे नेहमी ताजीच खावीत कारण त्यात पोषक घटक अधिक असतात.
या घरगुती पील ऑफ मास्कने मिळवा डागरहित,चमकदार आणि निरोगी त्वचा
हाताच्या त्वचेचा रुक्षपणा आणि कोरडेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय