फणसाच्या बिया अलीकडे वेगेवेगळ्या उत्पादनामध्ये वापरल्या जातात. फणसाच्या बिया या प्रथिने, डाएटरी फायबर, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स यासह पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहेत.

‘या’ पद्धतीने खा फणसाच्या बिया
फणसाच्या बिया 15 ते 20 मिनिटे तव्यावर भाजून घ्या. त्या हलक्या तपकिरी झाल्यानंतर त्यावर थोडे काळे मीठ आणि चाट मसाला टाकून खा किंवा फणसाच्या बिया उन्हात वाळवा आणि त्याची पावडर बनवा. ही पावडर तुम्ही सलाड किंवा फळांवर टाकून खाऊ शकता. फणसाच्या बिया फळांसोबत स्मूदी बनवूनही घेऊ शकता.

फणसाच्या बियांचे आरोग्यदायी फायदे –

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
बियांमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्यासाठी आणि शरीराला संक्रमणाशी लढण्यास मदत करते.

स्नायूंना उत्तम बळकटी मिळते
फणसाच्या बिया उकडून, भाजून खाल्ल्यास शरीरातील स्नायूंना उत्तम बळकटी मिळते.

पचनासाठी उत्तम
फणसाच्या बियांमध्ये असणाऱ्या तंतुमय पदार्थाच्या उत्तम प्रमाणामुळे त्या पचनासाठी उत्तम मानल्या जातात. तसेच शरीरातील अतिरिक्त चरबीचे प्रमाण वाढू नये यासाठी फणसाच्या बिया आहारात जरूर समाविष्ट कराव्यात.

त्वचेसाठी गुणकारी
या बिया दूधात भिजवून ठेवा आणि नंतर याची बारीक पेस्ट तयार करा. दररोज ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 25 मिनिटानंतर पाण्याने धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील.
या बियांचे सेवन केल्यास त्वचेचा ओलावा जास्त राहतो. तसेच त्वचेचे रोग देखील दूर होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यास मदत करते
फणसाच्या बियांमध्ये थायामिन आणि रिबोफ्लेविन मुबलक प्रमाणात असतात आणि ब जीवनसत्त्वांना पूरक असतात. या बिया लवकर पचत नाहीत. म्हणून ते दीर्घकाळ भूक भागवतात. यामुळे आपण जास्त खाणे टाळतो आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
फणसाच्या बियांमध्ये आढळणारे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स चयापचय वाढवण्यास मदत करते. यामुळे कॅलरीज बर्न होतात आणि वजन सहज कमी होते.

तात्काळ ऊर्जा मिळते
फणसाच्या बिया कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्रोत आहेत, जे सेवन केल्यावर जलद ऊर्जा वाढवतात.

हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते
फणसांच्या बियांमधील फायबर, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे निरोगी रक्तदाब राखण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात.

मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर
फणसाच्या बियांचा अर्क रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे ते मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरते.