अनेकांना ड्रायफ्रूट खायला खूप आवडतात मात्र यातील बदाम खाण्याची वेळ आली की अनेकांची नाकेही मुरडतात. परंतु, बदाममधील पोषक तत्व, व्हिटॅमिन ई, कॅल्शिअम, लोह, झिंक आणि मॅग्नेशिअम आपल्याला अत्यंत आरोग्यदायी ठरवू शकतात.
एका अभ्यासानुसार बदामामध्ये विविध प्रकारचे पोषक घटक आढळतात ज्यामध्ये व्हिटॅमिन, खनिजे, प्रथिने फायबर याचा समावेश असतो. यावरुन आपल्या अंदाज येईल की बदाम आपल्याला किती फायदेशीर ठरू शकते. मधामध्ये भरपूर औषधी घटक असतात. त्यामुळे बदाम आणि मध एकत्रित खाण्याचे आपल्या शरीराला काय काय फायदे आहेत ते आपण पाहणार आहोत.
हृदय मजबूत बनवते :
एक अभ्यासानुसार, भाजलेले बदाम आणि मध हे एकत्रितरित्या खाल्यास तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल पातळी उत्तम होण्यास मदत होते. बदाम आणि मध यामध्ये असे गुणधर्म आहेत की यामुळे हृदयविकार दूर ठेवण्यासही मदत होते.
वजन नियंत्रणात राहते :
बदाम आणि मधाचे सेवन केल्याने तुम्ही वाढलेले वजन नियंत्रणात ठेवू शकतात. मधमधील भूक कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही आहार घेतानाही नियंत्रित आहार घेतात. प्रथिने आणि फायबर याचे प्रमाण बदामामध्ये भरपूर असते. त्यामुळे बदाम आणि मध एकत्रित खाण्याने तुम्हाला सतत भूक लागत नाही आणि तुम्ही जास्त खाणे टाळता. तसेच मधामुळे चयापचय क्रिया सुधारते.
लोहाची कमतरता दूर होते :
बदाम मध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते. तसेच त्यात पोषक तत्वही भरपूर असतात. बदामाच्या एक औंसमध्ये 1.05 मिलीग्रॅम लोह असते. तर एक चमचा मधामध्ये 0.09 मिलीग्रॅम लोह (iron) असते. ही प्रमाण प्रौढ व्यक्तीसाठी अन्न आणि पोषण मंडळाने शिफारस केलेल्या दैनंदिन लोहाच्या सेवनाच्या 1.1 टक्के समतुल्य आहे.
मधुमेह नियंत्रणात :
मधुमेह होण्याचे कारण शरीरात वाढणारे साखरेचे अति प्रमाण. परंतु तुम्ही मधाचे सेवन केल्यास वजनासह रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहते. तसेच मध आणि बदाम एकत्रित खाल्याने शरीराला ऊर्जा तर मिळतेच पण ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते.