गुलकंद शरीरात थंडावा निर्माण करते. त्यामुळे ज्याला उष्णतेचा त्रास होत असेल तर, नियमित गुलकंद खावा. गुलकंदामधील पोषक तत्व तुमच्या शरीरातील उष्णता शोषून घेण्यास मदत करतात.
गुलकंद शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते. त्यामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असेल तर गुलकंद नियमित खावा.
गुलकंद खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते.
गुलकंदामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते. मॅग्नेशियम रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
डोळ्यांची जळजळ होत असेल तर गुलकंद खावा.
झोप येत नसेल तर रोज रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी दूधात गुलकंदटाकून प्यावा. यामुळे मन शांत राहील आणि चांगली झोपही येईल.
गुलकंद नियमित खाल्ल्याने पचनतंत्र सुधारते. पोटाच्या समस्या उद्भवत नाहीत.
गुलकंद नियमित खाल्ल्यानंतर त्वचा अधिक तजेलदार होते.
गुलकंदामध्ये व्हिटॅमिन बी असते. त्यामुळे तोंड आलं असेल तर गुलकंद खावा.
त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी ‘केशर’चा असा करा वापर
हवामान बदलामुळे सर्दी-खोकला झालाय ? मग ‘हे’ घरगुती उपाय करून पहा