भारतीय संस्कृतीमध्ये जेवणाआधी तूप खाण्याची पंरपरा पूर्वीपासून चालत आल्याचे दिसून येते. तूप ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन ए या घटकांनी समृद्ध असते. तूप जर सकाळी उपाशी पोटी खाल्ले तर त्याचे शरीराला अनेक फायदे जाणवतात. जाणून घ्या उपाशी पोटी तूप खाण्याचे फायदे –

पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत
नियमित उपाशी पोटी तूप खाण्याची सवयीमुळे पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. अल्सर आणि कॅन्सर यासारख्या आजारापासूनही संरक्षण मिळते. अनेकांना पोट कडक झाल्यासारखे वाटते. अशा व्यक्तींनी सकाळी अनुषीपोटी तूप खाल्यास पोट मऊ होऊन साफ होते.

इम्युनिटी वाढते
तूप हे ब्यूटिरिक अ‍ॅसिडसह समृद्ध असते. हा घटक इम्युनिटी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे उपाशी पोटी तूप खाल्ल्याने तुम्हाला आजारांशी अगदी सहज लढण्याची क्षमता मिळते.

वजन कमी होण्यास मदत होते
नियमित उपाशी पोटी तूप खाल्ल्याने मेटाबॉलिज्म वेगाने होते. त्यामुळे बेली फॅट कमी होण्यास मदत होते. तसेच सकाळी उपाशी पोटी तूप खाल्ल्याने भूकेवर नियंत्रण राहते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

त्वचा सुंदर बनते
जर तुम्हाला तजेलदार, नितळ त्वचा हवी असेल तर तुम्ही रिकाम्या पोटी तुपाचे सेवन करू शकतात. यामुळे त्वचेला ग्लो येईल.

हाडे मजबूत होतात
तूप खाल्याने हाडे मजबूत होतात आणि स्टॅमिनाही वाढतो. तसेच आरोग्यात सुधारणा होते.