देशी तुपाचे सेवन केल्याने आपल्याला पुष्कळ आवश्यक पोषण तत्वे (कॅलरी, फॅट, सॅच्युरेटेड फॅट, व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के) मिळतात. जाणून घ्या देशी तूप खाण्याचे फायदे-

*डोळ्यांसाठी फायदेशीर-
देशी गायीच्या तूपात अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल आणि जीवनसत्त्वे असतात जे आपल्या शरीराला संक्रमणापासून वाचवतात. हे घटक शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. एक चमचा गाईच्या तूपात एक चतुर्थांश चमचा काळीमिरी मिसळा आणि सकाळी आणि रात्री झोपेच्या आधी रिकाम्या पोटी खा. यामुळे तुमच्या डोळ्यांची दृष्टी वाढेल.

*केसांना हायड्रेट करते-
तुमचे केस निस्तेज व खराब झाले असतील तर स्कल्प मजबूत करण्यासाठी तूप वापरू शकता. तूपात बरेच फॅटी अ‍ॅसिड असतात जे केसांना आतून हायड्रेट करतात. याचा वापर केल्याने तुमचे केस मॉइश्चराईज राहतील.

*लठ्ठपणापासून मुक्तता-
तूपाचं सेवन केल्याने लठ्ठपणापासून मुक्त होण्यास मदत होते. देशी तूपात उपस्थित सीएलए मेटाबॉल्जिम योग्य ठेवते, ज्यामुळे वजन नियंत्रित होण्यास मदत होते. गायीच्या तूपात कोलेस्टेरॉल आढळत नाही, जे शरीरात जमलेल्या, हट्टी चरबीला वितळवून मेटाबॉल्जिम वाढविण्यास मदत करते.

*पचनक्रिया चांगली राहते
हिवाळ्यामध्ये बद्धकोष्ठताची समस्या अधिक असते. जर तुम्ही झोपेच्या आधी एक कप गरम दूधामध्ये दोन चमचे तूप मिसळून प्यायल्यास तुम्हाला बरे वाटेल. देशी तूप पचन प्रक्रिया व्यवस्थित ठेवण्यात उपयोगी ठरू शकते.